महाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मेडियम सी.बी.एस.ई. स्कूल सावदा प्रजासत्ताक दिन साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी
सावदा दि २७— गोदावरी फाऊंडेशन संचलित, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मेडियम सी.बी.एस.ई. स्कूल सावदा येथे प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरूवातीला प्राचार्या सौ. भारती महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तिरंगी झेंड्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी परेड संचलन, कराटे व आत्मसंरक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच दुचाकी वरून चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखविले. शेवटी प्राचार्यांनी प्रजासत्ताक दिनाचे आपल्या भारतीयांच्या जीवनातील महत्व सांगितले. विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळेतील प्रत्येक घटकाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या पाटील ह्या विद्यार्थीनीने केले.



