न. प. तेल्हारा “मॉ जिजाऊ ऊद्यान”मध्ये शुशोभिकरणाचे कार्य वेगात.

*न. प. तेल्हारा “मॉ जिजाऊ ऊद्यान”मध्ये शुशोभिकरणाचे कार्य वेगात.. *स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा, तालुका प्रतिनिधी विजय घोडे.
तेल्हारा,तेल्हारा न. प. हद्दीत येणारे “मॉ जिजाऊ” ऊद्यानचे शुशोभिकरणाचे कार्य अतिशय वेगाने सुरू आहे. गेल्या काही वर्षांत या उद्यानात घाणीचे साम्राज्य वास्तव्यास होते, कुठे मद्य प्राशन करून फेकलेल्या बाटल्या तर कुठे घुटखा खाऊन फेकुन दिलेल्या पुड्या, कुठे साचलेले घाण गढूळ पाणी, तर कुठे वाढलेले गांजर गवत, तर कुठे तूट फूट झालेली बांधकामं, खेळणी अशा प्रकारची झालेली मॉ जिजाऊ ऊद्यानची दुरावस्था होती. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, न. प. प्रशासनाकडून या उद्यानाचं शुशोभिकरणाचं कार्य अतिशय जलदगतीने पूर्णत्वास जात आहे. हल्लीच या उद्यानामध्ये वृक्षारोपणाचे कार्य संपन्न झाले असून रंगरंगोटीचे तसेच इतरही बांधकाम सुरू आहे. मॉ जिजाऊ ऊद्यानचे विशेष म्हणजे या उद्यानात “भारत -पाकिस्तान” दरम्यान झालेल्या युद्धामध्ये भारतीय सैन्य दलाकडून वापरण्यात आलेल्या टँक्स पैकी एक “टँक” आहे व ते आपल्या तेल्हारा शहरामधील मॉ जिजाऊ ऊद्यान मध्ये आहे, नगरवासीयांसाठी या पेक्षा मोठी अभिमानाची दूसरी गोष्ट नसू शकते, यामुळे नगरवासीयांची मान तर अभिमानाने उंचावलेली आहे.तसेच या टँक भोवतालच्या परिसरात लॉन तसेच निसर्गरम्य वातावरण तयार करण्यात येत असून लहान मुलांकरता खेळणी, सुद्धा आहे तसेच नवीन काँक्रिटचा “वॉक वे” तयार केला जात आहे, हल्ली या “वॉक वे” ची अभिसाधनाची प्रक्रिया सुरू असून उद्यानचे शुशोभिकरणाचे इतर कार्य जलदगतीने पूर्णत्वास जात आहे.



