वन बुलढाणा मिशनची २२ ला श्रीराम वंदना यात्रा

मातृतिर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव काढणार रथयात्रा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
बुलढाणा: २२ जानेवारी चा दिवस संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
हा ऐतिहासिक सोहळा स्मरणीय करण्यासाठी संदीप शेळके यांच्या नेतृत्व तील’वन बुलढाणा मशिन’ने पुढाकार घेतला जानेवारीला वन बुलढाणा मिशनच्या वतीने मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव अशी श्रीराम वंदना यात्रा काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊंना वंदन करून सकाळी ५:४५ ला या त्रेला सुरुवात होणार असून यात्रा रात्री ८ वाजता संतनगरी शेगाव पोचणार आहे.
वन बुलढाणा मिशन या राजकीय लोक चळवळीला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संदीप शेळकेंच्या संवाद सभांना होत असलेली गर्दी अन् त्यातही मुद्द्याचे राजकारण यामुळे संदीप शेळके यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. दरम्यान आता श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम वंदना यात्रेची देखील जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात विविध अर्थाने चर्चा सुरू आहे.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विषय हा राजकीय नाही तर राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. परभू श्रीरामचंद्राचे जन्मभूमीत मंदिर होणे ही गौरवाची बाब आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा स्मरणीय व्हावा यासाठी श्रीराम वंदना यात्रा असल्याचे वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आपला अजेंडा आहे, त्यामुळे जिल्ह्याच्या मांगल्यासाठी आपण प्रार्थना करणार असल्याचे ते म्हणाले.
असा आहे यात्रेचा मार्ग
मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीतून सुरू होणारी श्रीराम वंदना यात्रा किनगाव राजा, वीर पांग्रा, बिबी, मांडवा, मलकापूर पांगरा, शेंदुर्जन, साखरखेर्डा, लव्हाळा फाटा, मंगळूर नवघरे, अमडापूर उदयनगर, खामगाव मार्गे संतनगरी शेगावात दाखल होणार आहे. यात्रेदरम्यान गावोगावच्या मंदिरात पूजन होणार आहे. इंडियन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायक राहुल खरे या यात्रेदरम्यान गीत रामायण तसेच राम भक्तीची गीते सादर करणार आहे.



