महाराष्ट्र

*28 मे ला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस  तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्था तेल्हारा र. नं. 257 एफ. महा. यांच्या वतीने दिनांक 28 मे 2023 रविवार रोजी चौरंगीनाथ महाराज संस्थान आश्रम पारळा ता. अकोट जिल्हा अकोला येथे सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
   या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आ. श्री रणधीर सावरकर अकोला जिल्हा अध्यक्ष भाजप यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री प्रकाश भारसाकळे आ. अकोट हे असणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. संजय कुठे आ. जळगाव जामोद व आकाश भाऊ फुंडकर आ. खामगाव, मा. संदीप भाऊ खारोडे मा. सभापती कृ.उ.बा.समिती तेल्हारा दादाराव बाळकृष्ण सपकाळ अध्यक्ष विनायक महाराज मंदिर शेरी. तसेच या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणुन मा. निमा अरोरा जिल्हाधिकारी अकोला, मा. ज्ञानोबा फड ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा.  मा. संतोष येवलीकर तहसीलदार तेल्हारा मा.अनिल भाऊ गावंडे अध्यक्ष लोकजागर मंच .व कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणुन मा.आ. गोपीकिशनजी बाजोरीया शिवसेना उपनेते अकोला जिल्हा संपर्कप्रमुख, मा.श्री मनीष राहाटे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा तसेच या कार्यक्रमाला विविध पक्षाचे पदाधिकारी, संस्थेचे सदस्य, सामाजिक संस्था, पदाधिकारी तसेच  पत्रकार बांधव उपस्थित असणार आहे विशेष सहकार्य चौरंगीनाथ महाराज संस्थान व समस्त गावकरी मंडळी पारळा व गोपालनाथ चौरंगीनाथ साळुंखे चौरंगीनाथ महाराज संस्थान चे संस्थापक. तुकाराम श्रीराम गायकवाड चौरंगीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष.  शिवनाथ चौरंगीनाथ साळुंखे चौरंगीनाथ महाराज संस्थानचे सचिव .
   या कार्यक्रमाचे आयोजक  निलेश किसनराव पुदाखे सामाजिक कार्यकर्ते तेल्हारा व मा. नागोराव रामचंद्र वानखडे  भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती तथा संस्थापक अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय तेल्हारा हे  असणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button