बुलढाणाविदर्भ

नीट यु जी २०२६ पेपर फुटी प्रकरण, पुणे येथील प्राध्यापिका मनीषा अंधारे यांना सीबीआयने केली अटक!!! मनीषा अंधारे पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापिका!!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

प्रतिनिधी , रतन भगत.( सादोळा, बीड) सविस्तर वृत्त असे की, बहुजन समाजाचे अधिकार हिरावून घेणार हिंदुत्व म्हणजेच आर एस एस चे ब्राह्मणत्व नीट पेपर फुटी प्रकरणात आर एस एस चे लोक स्वामी नसून उच्च भरनीय जातीने फायदा मिळवण्याचा हे एक मोठं षडयंत्र आहे. यंदाची म्हणजे२०२६ नीट युजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने पुणे येथील प्राध्यापिका मनीषा अंधारे यांना अटक केली आहे मनीषा अंधारे ह्या पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका आहे मनीषा अंधारे या शिक्षण मंत्रासोबत फोटोमध्ये दिसून येत आहेत त्या त्यांच्या घरी एक कोचिंग प्रोग्राम चालवत होत्या तिथे त्या वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्राच्या महत्त्वाच्या प्रश्नांना वह्यांमध्ये लिहून पाठ्यपुस्तकांमध्ये गुन्हा करायला विद्यार्थ्यांना लावत असत. नंतर हे प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळले असे सीबीआयचे म्हणणे आहे. मनीषा अंधारे मॉडर्न कॉलेज पुणे येथील प्राध्यापिका असून मॉडर्न कॉलेज हे आर एस एस च्या विचारधारेच्या लोकांचे आहे. मिलिंद भाऊ एकबोटे हे आर एस एस च्या हिंदू आघाडीसी संबंधित आहेत आणि त्यांचे भाऊ गजानन एकबोटे हे मॉडर्न कॉलेजचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक डॉक्टर निवेदिता एकबोटे ह्या भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत याच मॉडर्न कॉलेजमध्ये दलित विद्यार्थी प्रेम बिरहाडे याला युके मधील नोकरीसाठी मंजुरी देण्यास विलंब केला होता की ज्यामुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली. या प्रकरणाचाही मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता सीबीआयने नीट पेपर फुटी प्रकरणे राजस्थानचा दिनेश दिवाला हा भाजपशी संबंधित असून त्याला अटक केली आहे त्यावेळेस तो म्हणत होता मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी माझा बळी देऊन कोणाला वाचवले जाते याचे गुड आहे.
देशाच्या सत्तेत असलेले लोक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे आज 23 लाख विद्यार्थी अहोरात्र अभ्यास करून नीट परीक्षा देतात त्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या आई-वडिलांच्या कष्टावर पाणी फिरले गेले आहे देशातून अनेक भागातून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या बातम्या ऐकायला मिळत आहे ही अशी परिस्थिती पाहून त्यांच्या आई-वडिलांना फार मोठ्या प्रमाणात जास्ती वाटत आहे. परंतु सत्तेत असलेल्या भाजपाला याचे काहीही सोयर सुतक नाही पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिक्षण मंत्र्यांसोबत त्यांचे फोटो यातून शासन नियंत्रणात किती गंभीर आहे हे लक्षात येते. नेटचा पेपर फोडून तो ठराविक उच्च घेऊन या जातींना मिळेल याची खबरदारी आरएसएसचे लोक येत असावेत ज्यामुळे कष्ट करणाऱ्या बहुजन मुलांचा अधिकार हिरावल्या जातो. बहुजनांचे अधिकार हिरावण्याचे षडयंत्र बहुजन लोकांना हिंदुत्वाच्या नावाखाली समजत नाही हे आपलं दुर्दैव आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button