
निराधार योजनेची २ महिण्यापासून बैठक नसल्याने लाभार्थ्यांची भटकंती शिवसेना तालुकाप्रमुख थारकर आक्रमक बैठक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
( प्रतिनिधी राजेंद्र मुंडे )
शेगांव/प्रतिनिधी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची बैठक दोन महिन्यापासून झाली नसल्याने पात्र लाभार्थ्यांच्या चकरा तहसील कार्यालवर आहेत त्यामुळे लाभार्थ्यांना नाहक भुर्दंड होत असल्याने ही बाब शिवसेना तालुकाप्रमुख रामेश्वर थारकर यांना समजताच त्यांनी सरळ तहसील कार्यालय गाठून संजय गांधी निराधार योजना कक्षातील कर्मचाऱ्यांना निराधार योजने बाबत माहिती घेऊन बैठकी बाबत धारेवर धरत १० दिवसात बैठक न झाल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांचे समवेत उपतालुकप्रमुख मोहन लांजुळकर, सुयोग जुमळे यांचेसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने हजर होते



