महाराष्ट्रराजकीय

मोदींचा सेवेचा भाव हा प्रत्येक योजनेतून दिसतो,मोदींचे कार्य घराघरात पोहचवा– आ अँड आकाश फुंडकर खामगाव ::—

मोदींचा सेवेचा भाव हा प्रत्येक योजनेतून दिसतो,मोदींचे कार्य घराघरात पोहचवा– आ अँड आकाश फुंडकर खामगाव ::—

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा देशातील नागरिकांसाठी सेवेचा भाव हा त्यांच्या प्रत्येक योजनेच्या अमलातून दिसत आहे, त्यामुळे 9 वर्षातील त्यांचे कार्य घरोघरी पोहचवा असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकरांनी भाजप पदाधिकारी व कफायकर्त्यांनी केले. मोदी @९ महाजनसंपर्क अभियानची सुरवात आज खामगाव विधानसभा मतदारसंघात करण्यात आली. ३० मे ते ३० जून पर्यंत या कालावधीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा जे पी नड्डा यांचे नेतृत्वाखाली देशभर लोकसभा मतदारसंघात विशेष मोदी @ 9 हे विशेष महा जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने आज खामगाव यथे तलाव रोडवर अजय अग्रवाल यांचे शेतात भाजपची टिफिन बैठक पार पाडली. त्यावेळी आ फुंडकर बोलत होते. या टिफिन बैठकीत खामगाव मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी आपल्या घरून स्वतःचा जेवणाचा टिफिन आणला व या बैठकीत येणाऱ्या सर्व निवडणूक साठी मंथन केले. या बैठकीला संबोधित करताना आ अँड फुंडकर म्हणाले की गेल्या 9 वर्षात केंद्रात मोदी सरकारने देशात सर्व क्षेत्रात मोठे कार्य केले आहेत. अनेक मोठे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. कोरोना सारख्या महामारीत चांगलं काम केलंय शिवाय देशाला डबघाईपासून वाचविले. असे अनेक मोठे कार्य केले. त्यामुळे आज देश व विदेशात त्यांची मोठी लोकप्रियता आहे. यासह त्यांनी देशातील सर्व सामान्य लोकांना रस्ता, घर, पाणी, वीज या सर्व सुविधा पूर्ण करण्यासाठी मोठे काम केले. मूलभूत गरजांसह त्यांनी सामाजिक गरजा सुद्धा ओळखून काम केले. ते चांगलं काम करत आहेत हेच विरोधातील पक्षाना पचवत नाही, त्यामुळे केवळ मोदींना हरविण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत आहेत. हे मोदींना हरवू शकत नाहीत, परंतु आपण मोदींचे काम , विचार, कार्य घरोघरी पोहचवा असे आवाहन आ अँड आकाश फुंडकर यांनी केले. या टिफिन बैठकीत आ अँड फुंडकर यांचेसह जेष्ठ नेते साहित्यिक रामदादा मोहिते , महाराष्ट्र भाजप सोशल मीडिया प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर, भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख, खविस अध्यक्ष शिवाभाऊ लोखंडकार, जिल्हा सचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, खामगाव तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, शेगाव तालुकाध्यक्ष विजय भालतीडक, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांचेसह माजी जि प सदस्य, नगराध्यक्ष, सभापती , प स सदस्य, नगरसेवक, जेष्ठ पदाधिकारी, खामगाव , शेगांव तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या घरून स्वतःचा टिफिन घेऊन उपस्थित होते. यावेळो आ अँड फुंडकर यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे भेटी घेऊन संवाद साधला व त्यांचे सोबत त्यांचे घरून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button