महाराष्ट्रमुबईविदर्भ
अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी सकल मराठा समाजाचे ठीया आंदोलन……

अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी सकल मराठा समाजाचे ठीया आंदोलन…… जी.डी.रोकडे बुलढाणा प्रतिनिधी.. खामगाव_ जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलन कावर लाठीचार्ज करण्यात आल होता. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर आतापर्यंत कारवाई करण्यात आली नाही त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी तसेच मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावे आधी मागण्यासाठी स्थानिक सकल मराठा समाज बांधवांनी आज 8 सप्टेंबर 2023 रोजी येथील उपविभागीय अधिकारी महसूल कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले असून मागणी पूर्ण न झाल्यास ११ सप्टेंबर पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती आंदोलन कर्त्यांनी दिली….



