नायगाव येथील निवृत्त अंगणवाडी सेविका सौं विमल सौंदळे यां महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामस्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित

नायगाव येथील निवृत्त अंगणवाडी सेविका सौं विमल सौंदळे यां महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामस्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित :-सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील प्रत्येक गाव खेड्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी व्हावी त्या पाठोपाठ ज्या महिला सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत अशा महिलांचा सन्मान व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामस्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सरपंचांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात यावे असे परिपत्रक काढले होते त्या अनुषंगाने नायगाव ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांची जयंती साजरी केली गेली तसेच नायगाव येथील अंगणवाडी सेविका विमल सदाशिव सौंदळे आणि जयश्री सुनील महाजन यांना सामाजिक क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षापासून अविरत काम करत असल्याने त्यांना यावर्षी चा महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामस्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी नायगाव गावचे सरपंच मोनाली किशोर महाजन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला व प्रशस्तीपत्र देण्यात आले त्याप्रसंगी विशेष उपस्थिती ग्राम विस्तार अधिकारी मंगुराम महाराज तसेच ग्रामसेवक आर के मोरे उपसरपंच महेश पाटील सदस्य सुपडाबाई भालेराव ईश्वर धनगर अंगणवाडी मदतनीस सुजाता टेमकर महिला ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते



