नागपूर येथे धम्मचक्र परिवर्तन दिन दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )
१) नागपूर – मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल २० (ICF) कोच-
०१०१८ वन वे स्पेशल नागपूर येथून दि. २४.१०.२०२३ (मंगळवार) रोजी २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.
थांबे: नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस.
संरचना: ५ द्वितीय आसनश्रेणी, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह १५ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण = २० ICF कोच).
२) नागपूर- पुणे वन वे स्पेशल २४ (ICF) कोच-
०१०३० एकेरी विशेष गाडी दि. २४.१०.२०२३ (मंगळवार) रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १७.४५ वाजता पोहोचेल.
थांबे: नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड मार्ग आणि पुणे
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १३ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणीसह २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन (एकूण = २४ ICF कोच)
३) नागपूर – मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल २४ (ICF) कोच-
०१०३२ एकेरी विशेष गाडी दि. २५.१०.२०२३ (बुधवार) रोजी नागपूर येथून १५.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता पोहोचेल.
थांबे: नागपूर, अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस.
संरचना: २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह २४ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण = २४ ICF कोच).
४) सोलापूर – नागपूर वन वे स्पेशल २४ (ICF) कोच-
०१०२९ एकेरी सुपरफास्ट स्पेशल दि. २४.१०.२०२३ (मंगळवार) रोजी २०.२० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १३.०५ वाजता पोहोचेल.
थांबे: सोलापूर, कुरुडवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि नागपूर
संरचना: २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅनसह २४ सामान्य द्वितीय श्रेणी (एकूण= २४ ICF कोच).



