महाराष्ट्र

राज्यस्तरीय स्पर्धेत अंकिता राऊत-पारेकर ही ठरली काष्य पदकाची मानकरी

वाशिम जिल्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा अंकितावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

केनवड- दिनांक ८व 9 जुलै रोजी कोपरखैरणे नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्यस्तरीय पिनॅक सिलेट या खेळाचे आयोजन केले होते .यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून विविध वजन गटातून जवळपास 300 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत केनवड येथील एकनाथ बबनराव पारेकर यांच्या पत्नी अंकिता राऊत पारेकर यांनी वाशिम संघाकडून खेळतांना 50 ते 55 वजन गटात तृतीय पदक प्राप्त करून घवघवीत यश संपादित केले. या स्पर्धेसाठी तिने कठोर परिश्रम करून यशाला गवसणी घातली व वाशिम जिल्ह्याला एक पदक प्राप्त करून दिले असून केनवड या गावाचे नाव राज्यस्तरावर नेल्यामुळे केनवड वासीया करिता ही खूप अभिमानाची बाब आहे. ती आपल्या यशाचे श्रेय रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित भाऊ झनक साहेब ,श्री बाळासाहेब गोटे सर, श्री कुलदीप बदर सर, श्री दिपक शेवाळे साहेब व श्री सौदागर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.तसेच केनवड येथील गावकरी,मित्र मंडळी,अंकिताचे सासू,सासरे,आई,वडील,दिर गजानन बबनराव पारेकर,सुधाकर इंगळे सर केंद्र प्रमुख जी.प.शाळा केनवड यांनी अंकीताचे भरभरून कौतुक केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button