आंतरराष्ट्रीयखानदेशजळगावा जिल्हा

नवीन ३ ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस आज पासून सुरु; पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांनी दाखविला हिरवा झेंडा…

नागपूर (अंजनी)-पुणे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे भुसावळ स्टेशन येथे केले स्वागत.

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांनी आज नवीन ३ वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना बंगळुर (कर्नाटक) येथे आयोजित कार्यक्रमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. सदर कार्यक्रमाचे भुसावळ स्टेशन येथे आयोजन करण्यात आले असता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह मंत्री श्री.गिरीषजी महाजन, मंत्री श्री.शिवेंद्रराजे भोसले, मंत्री श्री.संजयजी सावकारे यांनी उपस्थित राहून नागपूर (अंजनी)-पुणे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस चे स्वागत केले, तसेच हिरवा झेंडा दाखवून गाडीस पुणे कडे रवाना केले.

मुंबई – नागपूर किंवा पुणे – नागपूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यावर अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रवाशांची मागणी होती, त्यानुसार केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन तसेच पत्र व्यवहार करून अनेकवेळा मागणी केली होती. आता सदर मागणीस यश आले असून, आज पासून पुणे – नागपूर (अजनी) मार्गावर आठवड्यातून ६ दिवस वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस मुळे अवघ्या १२ तासांत पुणे ते नागपूर चा प्रवास होणार आहे. ही गाडी या मार्गावरील सर्वांत वेगवान रेल्वे ठरणार आहे. सध्या पुणे-नागपूर मार्गावर हावडा-दुरांतो एक्स्प्रेस ही सर्वांत जलद रेल्वे आहे. पुणे ते नागपूर अंतर कापण्यासाठी दुरांतोला १२ तास ५५ मिनीटे वेळ लागतो. ‘वंदे भारत’ ला त्याहून एक तास कमी वेळ लागणार आहे.

याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह मंत्री श्री.गिरीषजी महाजन, मंत्री श्री.शिवेंद्रराजे भोसले, मंत्री श्री.संजयजी सावकारे, जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, मंडळ रेल्वे व्यवस्थापक श्री. पुनित अग्रवाल तसेच महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button