तेल्हारा तालुक्यातील कोठा गावातील शेतकऱ्यांसाठी उद्धव सेनेचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना निवेदन! शेतकरी जगताहेत दहशतीमध्ये!

विजय घोडे स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
अकोला दि.०८ मे ; मागील महिन्यात
३० एप्रिल २०२४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास
तेल्हारा तालुक्यातील कोठा शेत शिवारात ११ शेतकऱ्यांच्या शेतातील असलेले पाईप , स्प्रिंकलर , स्टार्टर ई. साहित्याचे अज्ञात व्यक्तीने कोयत्याच्या सहाय्याने तोडफोड करुन नुकसान केले व एका शेतकऱ्याच्या विहिरीत टाकले . यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासंदर्भात तक्रार सुद्धा दाखल केली होती मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्याकारणाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने दि. ६ मे रोजी जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांचे नेतृत्वाखाली या प्रकरणाची योग्य ती कारवाई पोलिसांनी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे व दोषी व्यक्तींवर कारवाई करावी. अशा स्वरूपाचे निवेदन अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांना देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोठा गावातील शेतकऱ्यांच्या शेती उपयोगी साहित्याची अज्ञात व्यक्तीकडून स्थानिक पो.स्टे. हद्दित दोन वेळा तोडफोड करण्यात आली . गतवर्षी तीन ऑगस्ट २०२३ च्या मध्यरात्री अज्ञात इसमाने १० शेतकऱ्यांचे शेतातील स्टार्टर आधी साहित्याची तोडफोड केली व २९० पाईप कोयत्याने फोडले तसेच वैभव दिवाकर आहेरकर यांच्या शेतातील गोदामात ठेवलेला कापुस सुद्धा पेटवून देण्याचा प्रयत्न केल्या गेला होता. यासंदर्भात ४ ऑगस्ट २०२३ रोजी तक्रार दिल्यानंतर सुद्धा पोलिस कारवाई नाही! हे दुर्दैव आहे .असाच प्रकार ३० एप्रिल २०२४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ११ शेतकऱ्यांच्या शेतातील स्पिंकलर पाईप, स्टार्टर , पाईप कोयत्याच्या सहाय्याने फोडून एका शेतकऱ्याच्या विहिरीत टाकले . याबाबत शेतकऱ्यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनला एक मे २०२४ रोजी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी पंचनामा केला परंतु त्यानंतर कोणतीच कारवाई अध्यापर्यंत नाही! नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून यासंदर्भात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी याबाबतचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे-
अगष्ट २०२३ मधिल नुकसानग्रस्त शेतकरी कैलास पोटे, अशोक पोटे, विनोद अहेरकर, विश्वास अहेरकर, शाम अहेरकर, धनंजय पोटे, वैभव अहेरकर, दिवाकर अहेरकर, प्रकाश कोरडे, दीपक अहेरकर तर यावर्षी योगेश्वर अहेरकर, गणेश अहेरकर, ज्ञानेश्वर पोटे सुधाकर गावंडे, विश्वास अहेरकर, भास्कर अहेरकर, गणेश हेरोडे, रामकृष्ण पोटे, प्रमोद कोरडे, शेषराव अहेरकर, विनोद कोरडे, या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांच्या शेती उपयोगी वस्तूंची हानी झाली असून यांची नावे निवेदनात नमुद आहेत.
सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे मात्र या घटनेने शेतकऱ्याच्या मनात आज भीती असून तोडफोड करणारे व्यक्ती हत्यार बंद असल्याने एकटा-दुखता शेतकऱ्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो सादर प्रकारामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, यांचेसह जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ, जि.प.सदस्य सौ.किरण शिवा मोहोड, उपजिल्हाप्रमुख शेतकरी सेना गोपाल विखे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.✍️



