Uncategorized

अस्वच्छ सफाई कामगारांकडून

कर्जासाठी ऑनलाईन अर्ज मागविले

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

    वाशिम- : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ,नवी दिल्लीकडून अस्वच्छ सफाई कामगार व त्यांच्यावर अवलंबितांचे पुनर्वसनासाठी 83 कर्ज प्रकरणांचे भौतिक व 3 कोटी 70 लक्ष रुपयाचे आर्थिक उदिष्ट देण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र अस्वच्छ सफाई कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबातील 18 ते 50 वर्ष वयोगटातील अर्जदारांनी कर्ज मागणीसाठी अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अधिकृत https://mpbcdc.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. कर्ज मागणीबाबत आवश्यक अटी व शर्तीची माहिती महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी पात्र व इच्छुक व्यक्तींनी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालय येथे संपर्क करावा.असे आवाहन  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी केल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button