बुलढाणामहाराष्ट्र

छञपती श्री .शिवाजी महाराज न.प. हायस्कुल मध्ये तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा;– क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा. यांच्या संयुक्त विघमाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन . स्थानिक छञपती.श्री .शिवाजी महाराज नगर परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय दे.राजा येते दि.12,13 सप्टेंबर रोजी दोन दिवशीय कबड्डीचे सामने आयोजित केले आहेत . आज दि 12 सप्टेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात स्पर्धा सुरू झाल्या असुन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य संजय देशमुख सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष .तालुका क्रीडा संयोजक राजेश सपाटे सर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. तसेच तालुक्यातुन विविध शाळेचे खेळाडू व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. पंच म्हणून सचिन घुगे सर व सागर गवई सर हजर होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिल दंदाले सर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन राठोड सर यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button