सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत जलंब ते पातुर्डा धम्म पदयात्रा; समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे सुजित बांगर यांचे आवाहन….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २४ मे २०२६
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत परमपूज्य, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी जलंब ते पातुर्डा पर्यंत धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही पदयात्रा दिनांक २६ मे ते २९ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीला अभिवादन करण्यासाठी ही धम्म पदयात्रा काढण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगार यांनी दिली.
सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत सुरू होत असलेल्या धम्म पदयात्रेचे नेतृत्व पूज्यनीय भंते ज्ञानज्योती महास्थावीर हे करणार असून त्यांच्यासोबत भिकू संघ आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या पदयात्रेचे नेतृत्व पूज्यनीय भंते ज्ञानज्योती महास्थविर करणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूज्यनीय भिक्षू संघ, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या ऐतिहासिक व पवित्र भूमीला उजाळा देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी व सरकारने या बाबींची दखल घ्यावी यासाठी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहून परिसरात परिसरात संघटितपणे धम्ममय वातावरण निर्माण करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर यांनी केली आहे. सामाजिक एकता, बंधुता आणि विचारांची जागृती हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
ही धम्म पदयात्रा जळंब येथून प्रारंभ होत असुन माटरगाव, मच्छिंद्रखेड, तरोडा डी, येऊलखेड, कालखेड, मनसगाव, खिरोडा मार्गे पातुर्डा येथे पोहोचणार आहे. या ऐतिहासिक व प्रेरणादायी धम्म पदयात्रेत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी याची समर्थ समाज बांधवांनी नोंद घ्यावी.
या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक जनजागृतीला चालना मिळणार असून समाजामध्ये एकोपा व बंधुभाव अधिक दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. समाजबांधवांनी या पदयात्रेची नोंद घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे…..✍️



