खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

नंदुरबारमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; नुकसान भरपाई देण्याबाबत आमदार एकनाथराव खडसे यांची मागणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर व परिसरात बर्ड फ्लूचा (H5N1 विषाणू) प्रादुर्भाव पसरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यावर आमदार एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे. वाढत्या संसर्गामुळे बाधित क्षेत्रातील १ किलोमीटरच्या परिघातील ४ लाखांहून अधिक कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असून, २५ लाख अंडी आणि ५४८ टन पक्षी खाद्य (पोल्ट्री फीड) पूर्णपणे नष्ट करावे लागले आहे. तसेच, या काळात शहरातील चिकन दुकाने, अंडी विक्री केंद्रे आणि बिर्याणी सेंटर्स बंद करण्यात आली होती. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, पोल्ट्री कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सची आरोग्य तपासणी करणे आणि बाधित व्यावसायिक व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल आमदार खडसे यांनी उपस्थित केला होता.

यावर उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की, ‘प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९’ व ‘राष्ट्रीय कृती आराखडा-२०२१’ नुसार बाधित क्षेत्रातील कुक्कुट पक्षी, अंडी व खाद्य नष्ट करून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. आरोग्य विभागामार्फत पोल्ट्री कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सची करण्यात आलेल्या चाचणीतील सर्व नमुने नकारात्मक (Negative) असल्याचे ‘राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे’ यांनी अहवालात नमूद केले आहे. नुकसान भरपाईबाबत माहिती देताना मंत्र्यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या ‘पशु स्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रम’ या योजनेअंतर्गत ५०% केंद्र व ५०% राज्य हिश्श्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते आणि केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होताच ती संबंधित संबंधितांना दिली जाईल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button