
‘स्व.जयराम गायकवाड’ मेमोरियल फाऊंडेशन च्या ‘संत साहित्य भक्ती गौरव’ पुरस्काराने प्रा.मधुकर वडोदे सन्मानीत.खामगाव :स्व.जयराम गायकवाड मेमोरीयल फाऊंडेशन व सहर ए गझल अकादमी व्दारा आयोजीत साहित्यिक चळवळीच्या माध्यमातुन मराठी वाड्मय क्षेत्रातील प्रतिष्ठीत असलेल्या जिल्हास्तरीय ‘स्व. जयराम गायकवाड साहित्य गौरव’ पुरस्कार मागील तिन वर्षापासून दिला जात असून सन २०२३ करिता पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च डिसेंबर २०२२ या कालावधीतील प्रकाशित झालेले कथा, कविता, भक्ती, समीक्षण, गझल, या वाड्मय प्रकारातील पुस्तके आमंत्रीत करण्यात आली होती. संपुर्ण जिल्हायातून आलेल्या पुस्तकांमधुन उत्कृष्ट सहा साहित्यकृतीची निवड परिक्षकांकडून करण्यात आली.संपूर्ण जिल्हयात साहित्य क्षेत्रात सन्मानाचा समजला जाणारा ‘स्व. जयराम गायकवाड ‘संत साहित्य भक्ती गौरव’ पुरस्कार जिल्हयातील खामगावचे लेखक प्रा. मधुकर वडोदे यांच्या “जाणे भक्तीचा जिव्हाळा” या संत साहित्यावरील संत तुकाराम महाराजांच्या ३१ अभंगावर केलेले उत्कृष्ट निरूपण लक्षात घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळयाचे आयोजक सुप्रसिध्द गझलकार डॉ. गणेश गायकवाड तसेच साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा.सदानंद देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण माजी आमदार विजराज शिंदे, देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेंद्र काळे, गझलकार रियाज अनवर, शिवाजीराव जवरे, प्रा. नवलाखे, प्रा. किसन वाघ यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रशिस्तपत्र, व रोख रक्कम असे होते. तसेच इतर निवड केलेल्या साहित्यकृतीचेही पुरस्कर वितरीत करण्यात आले यामध्ये अजय देशपांडे, सुभाष किन्होळकर, किरण डोंगरदिवे, सुवर्णा पावडे, एजाज शेख, यांचाही सत्कार करण्यात आला. साहित्य समाजा करिता कसे उपयोगी आहे हे सांगून साहित्य निर्मीती बाबत योग्य असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सदानंद देशमुख यांनी केले. उपस्थित मान्यवरांची साहित्य संदर्भात भाषणे झाली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन व मान्यवरांचे आभार रविकुमार टाकळकर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



