संग्रामपूर नगरपंचायतसमोर अंघोळ करून केला निषेध

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
जमत नसेल तर राजीनामे द्या : रवी पहुरकर*
संग्रामपूर शहरात पाणीपुरवठा नियोजनामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे तरीही नगरपंचायत गाढ झोपेत असल्याचे सोंग घेऊन त्यांची मनमानी करत आहे तसेच आम्ही सत्तेत आल्यावर 3 दिवसात पाणीपुरवठा करू असे आश्वासन देऊन ह्यांनी जनतेचा विश्वासघात करून आज 10 ते 12 व्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे आणि त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे त्यात ठराविक ठिकाणीच अतिरिक्त पाणीपुरवठा केला जातो तेही नगरपंचायतने मनमानी लावली आहे नगरसेवकाच्या घरी 3 तास आणि नागरिकांना 1 तास असे जबरदस्त नियोजन चालू आहे ह्या कारणास्तव आज नगरपंचायत मध्ये गेलो असता नेहमीप्रमाणे एकही अधिकारी उपस्थित नाही आणि फोनद्वारे पाणीपुरवठा अधिकारी नाफडे यांच्यासोबत चर्चा करून त्वरित शहरात येऊन ह्यांचे नियोजन लावा अन्यथा आक्रमकतेचा पवित्रा घेऊ असे सांगितले त्यानंतर नगरपंचायत समोर रवी पहुरकार यांनी अंघोळ करून निषेध करण्यात आला.
#जलआक्रोशमोर्चा
#जमत नसेल तर राजीनामे द्या



