महाराष्ट्रविदर्भ

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगां च्या दारी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

आज दिनांक ०६ /१० / २०२३ रोज शुक्रवार ला,
सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमांमध्ये दिव्यांगाच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री या. श्री. बच्चुभाऊ कडू साहेब, बुलढाणाचे आमदार या. श्री. संजय गायकवाड, समाज कल्याण अधिकारी श्री मिरज साहेब, जी. प .सी. ओ. विसपुते मॅडम, जिल्हाधिकारी. डॉ. किरण पाटील साहेब, नगरपालिका सि .ओ. गणेशजी पांडेसरा इत्यादी मान्यवरांनी दिव्यांगाच्या विविध योजनांची माहिती दिली.
संत गाडगेबाबा अपंग पुनर्वसन बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या माध्यमातून मा. आमदार श्री. बच्चुभाऊ कडू यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात दिव्यांगाचे मानधन हे दर महिन्याला १० तारखेच्या आत व्हावे. नगर पालिका, ग्रामपंचायत, अंतर्गत असलेले गाय कमी दर आकारून दिव्यांगांना देण्यात यावे. ज्या दिव्यांगांना नगरपालिका, ग्रामपंचायत अंतर्गत व्यवसायासाठी तसेच रोजगारासाठी लीवर देण्यात आलेले भूखंड हे कायम स्वरूपी करण्यात यावे. ज्यांना घर नाही त्यांना बिनाअट घरकुल देण्यात यावे. दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड देण्यात यावे. वयाची अट शिथिल करून शासकीय कर्ज पुरवठा करण्यात यावा. नगरपालिका अंतर्गत न चुकता देण्यात येणारा ५% निधी दरवर्षी देण्यात येतो त्याचंप्रमाणे ग्रामीण भागातही देण्यात यावा. दर तीन महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी दिव्यांगाची आढाव बैठकीत दिव्यांगाचे प्रतिनिधी बोलावून त्यांना शासकीय स्तरावर सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली तर ती तळागाळातील दिव्यांगा पर्यंत पोहोचू शकते. दिव्यांग बचत गट स्थापन केलेल्या गटांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करावे. दिव्यांग बचत गटांना नर्सरी फुल झाडे, फळ झाडे, तयार करण्यास द्यावे. एस .टी. महामंडळाकडून होणारी दिव्यांगाची हेळसांड थांबवावी. यु.डी. आयडीची दुय्यम प्रत काढलेली असेल तर ती ग्राह्य धरून तिकीट द्यावे. शासकीय सामान्य रुग्णालयात होणारी सर्व प्रकारची दिव्यांग तपासणी ही दर बुधवार लाच करावी. खऱ्या दिव्यांगांना डावलून खोट्या दिव्यांगाची संख्या जास्त प्रमाणात वाढलेली दिसत आहे, यावरही अंकुश ठेवणे आवश्यक आहे. ज्या दिव्यांगांनी इ क्लास, सी क्लास ची जमीन ग्रामीण किंवा शहरी भागात काढलेली असेल तर ती पाच एकर जमीन त्या दिव्यांग व्यक्तीच्या नावे करून दिली तर त्या दिव्यांग व्यक्तीचा उदरनिर्वाह चालू शकेल. दिव्यांग बचत गटांना रोजगारासाठी पापड़ मशीन, शेवया मशीन, पॅकिंग मशीन, इत्यादी अनेक प्रकारचे उद्योग सवलतीच्या दरात बिनाअट कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावे.
अशा प्रकारचे निवेदन दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री या. श्री. बच्चु भाऊ कडू यांना देण्यात आले व निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून कळविले जाईल असे आश्वासन देण्यात आले.
यामध्ये सहभागी झालेले दिव्यांग बांधव, मीनाताई नामदेव डोंगरदिवे, सुनिता जाधव, सैय्यद सोयब, सिराज खान, विनोद निंबोकार , रामदास सपकाळ, सैय्यद दानिश, मो. सोफियान, प्रकाश चोपडे, किशोर जाधव इत्यादी दिव्यांग बांधव हजर होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button