बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दोन वर्षाच्या कार्याची पावती… शाल श्रीफळ देऊन सन्मान…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगांव जामोद

पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव 7 सप्टेंबर 2026 रोजी आसलगाव येथील श्री पी एम जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये आज सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री भगवान भाऊ टापरे यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कार्यकाळात खंबीरपणे साथ देणारे माजी उपाध्यक्ष माननीय जीवन भाऊ रायपुरे व संतोष भाऊ भाकरे तसेच तलवारे ताई शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुभाष भाऊ श्रीनाथ होते. भगवान भाऊ टापरे यांनी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात शाळेच्या विकासासाठी केलेल्या विविध कामांचा आणि प्रयत्नांचा लेखाजोखा मान्यवरांनी आपल्या भाषणातून मांडला. शाळेच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा शिक्षक उपलब्धतेसाठी केलेले प्रयत्न आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेली भूमिका याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी माननीय सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश भाऊ वानखडे, शाळेचे माननीय मुख्याध्यापक राठोड सर, व जैन मॅडम, पाटील सर यांनी समायोचित यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माननीय अनिल भगत सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पट्टे सर यांनी केले. यावेळी वांजाळ सर, रबडे सर, महोत्सव सर, वैभव सर, व जाधव मॅडम, श्री विठ्ठल राऊत त्यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते. सत्कार हा केवळ सन्मान नसतो, तर केलेल्या कार्याची समाजाकडून मिळालेली पावती असते. शाळेच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा असा गौरव निश्चित पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button