बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

अखिल भारतीय बौद्ध महासभा संग्रामपुर तालुका तसेच जळगाव जामोद तालुका पदाधिकारी यांची सावळी येथील बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथ प्रवचनाला सदिच्छा भेट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,

रतन भगत.

संग्रामपूर (सावळी) दि.७/९/२६ सविस्तर वृत्त असे की, वर्षावासानिमित्त संग्रामपूर तालुक्यातील सावळी येथे अखिल भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने जिल्हा संस्कार सचिव तसेच भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुका येथील पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सावळी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे मनन, पठण, आणि वाचन, चिंतन, गेल्या एक ते दीड महिन्यापासून सुरू आहे. या ग्रंथ प्रवचनासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी सावळी येथे सदिच्छा भेट दिली. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बुद्ध आणि त्याचा धम्म या पवित्र ग्रंथाला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार सचिव मिलिंद वानखडे, भाऊराव गव्हांदे, वंचित बहुजन आघाडी संग्रामपुर तालुका अध्यक्ष किशोर भाऊ भिडे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ग्रंथ प्रवचनकार मधुकरराव गवई साहेब यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सांगितलेल्या विचारांचे संबोधन उपस्थित जनसमुदायाला दिले. तसेच त्यांनी मानवाला होणारे दुःख आणि त्यावर उपाय हे भगवान बुद्ध चे विचार सुद्धा उपस्थित जनसमुदायाला समजावून सांगितले. तसेच तानाजी गवई यांनी सुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाविषयी मार्गदर्शन केले. तसेच बौद्धचार्य निलेश लहासे, अशोक वानखडे, रतन भगत यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाच्या प्रवचनाचा कार्यक्रम सावळी या गावांमध्ये अत्यंत शांततेने पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव आयु मिलिंद वानखडे, भाऊराव गव्हांदे, किशोर भिडे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संग्रामपूर, ग्रंथ प्रवचनकार बौद्धाचार्य मधुकरराव गवई, तानाजी गवई, बौद्धाचार्य निलेश लहासे, सिद्धार्थ लहासे, अशोक वानखडे, रतन भगत, तसेच सुजाता महिला संघ पंचाळा, आणि सुजाता महिला संघ सावळी इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button