बुलढाणामहाराष्ट्र

डिझेलच्या कमतरतेमुळे खरीप हंगामाची शेती तयार करण्यासाठी शेतकऱ्यांने नांगराचे जु घेतले स्वतःच्या खांद्यावर!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

तालुका प्रतिनिधी संग्रामपूर, रतन भगत.

दि.१९/५/२६ संग्रामपूर, सविस्तर वृत्त असे की सध्या आता शेतकऱ्यांच्या शेतीसाठी चार खरीप हंगाम हा तोंडावर आला असताना शेतीची मशागत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फार मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागले आहेत. त्याच धर्तीवर शेतकरी आपली जमीन नांगरण्यासाठी आणि शेतीची इतर मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करत असतात. मात्र सध्या जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील पेट्रोल पंपावर डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेती तयार करण्यासाठी चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच यावर उपाय म्हणून मजबुरीने संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या खांद्यावर वखराचे जु बांधून शेतीच्या मशागतीचे काम केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याची संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे.
बावनबीर येथील विशाल मुरुख नामक शेतकऱ्याने ट्रॅक्टर साठी डिझेल उपलब्ध होण्याबाबत अनचिता असल्याने जमिनीच्या खरीप हंगामाच्या नांगरणीसाठी वखराचे जु स्वतःच्या खांद्यावर ओढून शेतीची मशागत सुरू केल्याचे सांगितले. खरीप पूर्ण मशागतीची कामे सध्या वेगाने सुरू झाली असून बहुतेक शेतकरी आपल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती ची तयारी करीत आहेत. मात्र सध्या डिझेल पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकरी धास्तावले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button