महाराष्ट्रसामाजिक

राजवाडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सवाचे नियोजन

राजवाडा परिसरात यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून जयभीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नियोजन बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत यंदाचा जयंती उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि समाजभिमुख पद्धतीने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी गतवर्षी साजऱ्या झालेल्या जयंती उत्सवाचे परीक्षण करण्यात आले. त्यानंतर यावर्षीचा उत्सव अधिक सांस्कृतिक व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर जयंती उत्सवासाठी विविध पदांवर सर्वानुमते पुढीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या:

  • अध्यक्ष: विलास नाना साळवे
  • उपाध्यक्ष: पिंटू नाना साळवे
  • खजिनदार: दादू साळवे
  • कार्याध्यक्ष: दिपक रामजी साळवे

नवनियुक्त अध्यक्ष विलास नाना साळवे यांनी सर्वांचे आभार मानत जयंती उत्सव समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. समाजातील एकी आणि शिस्त यांना प्राधान्य देत उत्सव साजरा करण्याचा संकल्प त्यांनी केला.

बैठकीत दिपक रामजी साळवे यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, राजवाडा परिसरातील सर्व ज्येष्ठ व तरुणांनी यंदाही गटबाजी, मतभेद व राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे.

खजिनदार दादू साळवे यांनी सांगितले, “राजवाडा कुटुंब म्हणून एकत्र येणे हीच आमची खरी ताकद आहे. समाजातील एकी जपण्यासाठी जयंती हा मोठा अवसर आहे.”

राजवाडा व प्रभागातील नगरसेवक अरुण साळवे यांनी माहिती दिली की, यावर्षी जयंती उत्सवाला पाच दिवसांचा भव्य आकार देण्यात येणार असून या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, समाजजागृती उपक्रम, बौद्ध धम्मवाचन, प्रभातफेरी, स्पर्धा, व्याख्याने तसेच सामुदायिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

उपाध्यक्ष पिंटू नाना साळवे यांनीही सर्वांनी एकमुखीपणे उत्सव अधिक भव्य व प्रेरणादायी करण्याचे आश्वासन दिले. समाजाला कायम दिशा देणारे अजय सुरेश साळवे आणि भुषण गोरक्षनाथ साळवे यांनी योग्य मार्गदर्शन करून बैठकीची सुरुवात केली.

यावेळी बैठकीस नगरसेवक अरुण साळवे, माजी नगरसेवक संजय साळवे, राजु शामराव साळवे, किरण बाबुराव साळवे, सुभाष साळवे, राजेंद्र साळवे, दिपक साळवे, प्रदीप हिवाळे, अनिल साळवे, दिपक भाऊसाहेब साळवे, सचिन महीपती साळवे, मोहन साळवे, रवि पलघडमल, सचिन दौलत साळवे, सुनील रतन साळवे, नविन साळवे, रवि साळवे, दयानंद साळवे, सुनील चांदणे, करण साळवे, विजेंद्र गायकवाड, विकी कसबे, संदीप साळवे, सिद्धांत साळवे, सुनील दाभाडे, बाळु हिवाळे, इम्रान सय्यद, सलमान खान तसेच राजवाडा परिसरातील नागरिक, महिला मंडळ, जयभीम मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यंदाचा जयंती उत्सव समाजातील एकी, बंधुता आणि प्रेरणेचा संदेश देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button