बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दुःखाला माणुसकीची जोड; कै. सविता चित्ते यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगावराजा ; कै. सौ. सविता एकनाथ चित्ते यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त चिचखेड-मडपगाव, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा येथील कै. भास्कररावजी शिंगणे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दुःखद प्रसंगाच्या स्मृती जपत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

यावेळी सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक मधुकर उबाळे, आरोग्य अधिकारी डॉ. वैभव लहाने, अष्टविनायक शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी चित्ते सर, निमगाव गुरुचे सरपंच भिकाजी निलख,खडकपूर्णा प्रकल्पाचे अधिकारी गजानन मेटांगळे, भिकाजी चित्ते, सुरेश धारे, रामकिसन चित्ते सर, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी मधुकर उबाळे सर, डॉ. वैभव लहाने, रामकिसन चित्ते सर तसेच संस्थेचे सचिव शिवाजी चित्ते सर यांनी मनोगत व्यक्त करून चित्ते कुटुंबीयांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

चित्ते कुटुंबीयांनी मागील वर्षीही मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेत वही, पेन व इतर शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली होती. यंदाही त्यांनी कै. सविता चित्ते यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा उपक्रम सुरू ठेवत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. पुण्यतिथी केवळ स्मरणाचा दिवस न ठेवता समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न, अशी या उपक्रमामागील भावना असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

कै. सौ. सविता चित्ते यांचे काही वर्षांपूर्वी नीलगायीच्या धडकेत मोटारसायकल अपघातात गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. या दुःखद घटनेनंतरही चित्ते कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीची वाट सोडली नाही. साधारण कुटुंबातून आलेले असूनही माणुसकी, सामाजिक जाणीव आणि गरजूंच्या मदतीची भावना त्यांनी जपली आहे.

विशेष म्हणजे चित्ते कुटुंबीय हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी निष्ठा असलेले शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. सामाजिक कार्यातून आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपण्याचा त्यांचा हा प्रयत्न परिसरात चर्चेचा विषय ठरला.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून ‘स्मृती जपताना समाजाचे ऋण फेडण्याची’ भावना चित्ते कुटुंबीयांनी यानिमित्ताने कृतीतून दाखवून दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button