विजय वानखडे यांच्या बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवसउपोषण मंडपाला सुजित बांगर यांची भेट…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
संग्रामपूर:- २४ मार्च २०२६
दिनांक २३ मार्च २०२६ पासून
ऑल इंडिया पॅंथर सेना यांच्या वतीने
वकाना ते निरोड व वकाना ते भिलखेड या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांच्या गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या रस्त्यांसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे यांच खोटे लेखी आश्वासन देणाऱ्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांविरोधात बेमुदत अन्नत्या आमरण उपोषण सुरु आहे. विजय वानखडे यांनी गेल्या एक वर्षापासून या दोन्ही रस्त्याच्या संदर्भात वेळोवेळी शासन प्रशासनाला, लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली. भर पावसामध्ये झाडावर बसून “मचान आंदोलन” केले.तरी या बेजबाबदार सरकारला लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याचे अधिकाऱ्यांना अजून पर्यंत जाग आलेली नाही असा उपोषणकर्ते विजय वानखडे यांचा आरोप आहे. जोपर्यंत तात्काळ रस्ता चालू होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन मैदानात उतरलो आहे.या उपोषणादरम्यान माझ्या जीवीतास काही धोका निर्माण झाल्यास व बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन व संबंधित खात्याचे अधिकारी यांच्यावर राहील असे उपोषणकर्ते विजय वानखडे यांनी स्पष्ट केले आहे.
आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. त्यांनी उपोषणकर्त्याशी सविस्तर चर्चा करून मागणी जाणून घेतली व मागणी रास्त आहे असे मत व्यक्त केले. त्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.शासन प्रशासनाने या मागणीचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ न्यायिक निर्णय घ्यावा असे सुजित बांगर यांनी बोलतांना म्हटले आहे….



