महाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा शहरात काँग्रेस कमिटीच्या वतीने ,स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची 134 वी जयंती साजरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.१५:-
तेल्हारा नगर परिषदेच्या कार्यालया समोरच्या परिसरात असलेल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याचे तेल्हारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली तेल्हारा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संदीप भाऊ खारोडे व सामाजिक आंदोलन संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांच्या हस्ते भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांची जयंती बालक दिवस म्हणून साजरी करण्यात आली . सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरुजी यांच्या पुतळ्याच्या परिसराची साफसफाई करून त्यांच्या पुतळ्यावर दुधा अभिषेक जलाभिषेक करून पुजन व हार अर्पण करण्यात आले , तसेच त्यांचा नावाचा जयघोष करत ही जयंती साजरी करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरुजी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराज इलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ साली झाला, त्यांना १९५५ साली भारत रत्न पुरस्कार मिळाला पंडित जवाहरलाल नेहरूजी यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळा सर्वात जास्त होता, १६ वर्ष ९ महीने १२ दिवस येवढा होता, त्यांची जयंती बालक दिवस म्हणून साजरी करण्यात येते त्यांना ‌लहान लहान मुले फार आवडत होते , मोठ्या हर्षोल्लासात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महिला काँग्रेस कमिटी ,तेल्हारा शहर काँग्रेस कमिटी ,युवक काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button