चिखली शहरात भाजीमंडी व सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची मागणी

प्रतिनिधी -: सागर झगरे
चिखली – आज चिखली नगर परिषद येथे मुख्याधिकारी साहेबांना आणि नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख यांना निवेदन देऊन चिखली शहरातील भाजीमंडी, मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, परिसर तसेच इतर गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्याची मागणी करण्यात आली.
चिखली शहरातील भाजीमंडी, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने महिला विक्रेते, शेतकरी महिला, ग्राहक, विद्यार्थिनी तसेच विविध कामानिमित्त येणाऱ्या महिलांची वर्दळ असते. मात्र, त्यांच्यासाठी आवश्यक त्या दर्जाची स्वच्छतागृह सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
महिलांचे आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छता आणि सन्मान या दृष्टीने ही सुविधा अत्यंत आवश्यक असून, शहराच्या विकासाबरोबरच महिलांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे भाजी मंडी, मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र महिला स्वच्छतागृहे उभारून त्याठिकाणी नियमित पाणीपुरवठा, वीज आणि स्वच्छता व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष श्री .रवीभाऊ तोडकर, सौ ज्योती शिवशंकर खेडेकर श्री.संजय सावंत,श्री.राजेंद्र म्हस्के,गणेश देशमुख,वैभव आखाडे, जीवन पवार, गणेश पवार, विवेक निर्मळ, विठ्ठल मापारी, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, सुविधा ही त्यांची गरज नसून हक्क आहे!



