खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

भुसावळमध्ये तरुणीवर अतिप्रसंग; आरोपीला अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी


कार्यालयात बोलावून जबरदस्ती केल्याचा आरोप; फॉरेन्सिक तपासणीसह पोलिसांचा तपास वेगात
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील एका २२ वर्षीय तरुणीवर ओळखीच्या व्यक्तीने कार्यालयात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अतिप्रसंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी राजू गायकवाड याला तातडीने अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही टपाल विभागात कार्यरत असून ती भुसावळ येथे भाड्याच्या घरात राहत आहे. कामाच्या निमित्ताने तिची आरोपीशी पूर्वीपासून ओळख होती. दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी आरोपीने तिला बसस्थानक परिसरात बोलावून घेतले व चर्चा करण्याच्या बहाण्याने मुक्ताई कॉलनीतील स्वतःच्या कार्यालयात नेले. तेथे दरवाजा बंद करून आरोपीने तिच्याशी जबरदस्ती करत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे पीडितेने नमूद केले आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने दुसऱ्या दिवशी घरमालकाला घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या सल्ल्यानुसार तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीला रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन फॉरेन्सिक पथक व ठसे तज्ञांच्या मदतीने सखोल तपासणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले आहेत.
तसेच गुरुवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button