तिन राज्यात भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय! तेल्हारा शहरात भाजपा कडून विजय उत्सव साजरा !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी तेल्हारादि ६ मे |पश्चिम बंगाल, आसाम व पांडुचेरी या तीन राज्यात भारतीय जनता पार्टी च्या ऐतिहासिक विजयाबाबत दि.५ मे २०२५ रोजी तेल्हारा शहरातील टावर चौक येथे छत्रपती शिवरायांना हार अर्पण करून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिश बाजी करत विजय उत्सव साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांना हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय ,प्रभू रामचंद्र भगवान की जय ,भारत माता की जय ,वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो असा जयघोष करत फटाके फोडून पेढे वाटप करून विजयाचा जल्लोष साजरा केला व प.बंगाल आसाम व पांडूचेरी येथील सर्व जनतेला त्यांनी दाखवलेल्या भारतीय जनता पार्टीवरच्या विश्वासाला नमन करून सदरचा विजय त्यांना समर्पित केला . यावेळी प्रामुख्याने तेल्हारा नगरपरिषद नगराध्यक्षा सौ वैशालीताई पालीवाल, नगरपरिषद उपाध्यक्ष सचिन तायडे, सभापती व सतीश जयस्वाल, नगरसेवक रुपेश चव्हाण, भाजप मंडळ अध्यक्ष गणेश रोठे, तालुका सर चिटणीस रुपेश राठी, रामेश्वर हागे, विधी आघाडी अध्यक्ष ॲड मनोज राठी, डॉ आघाडी नेते
रुषिकेश चोपडे, गटनेता अतुल विखे , वरिष्ठ नेते अशोक गोयनका, गजानन नळकांडे, सुदेश शेळके, केशवराव ताथोड गजानन उंबरकर ,रविभाऊ गाडोदिया , बाबुसेठ पालीवाल, नगरसेविका सौ जयाताई बग्गन, नगरसेविका सौ. मोनिकाताई वाघ, जिल्हा युवानेते मयूर चहाजगुणे, गणेश इंगोले, ॲड पवन शर्मा, जितेंद्र पालीवाल,योगेश आप्पा , छोटू गावत्रे, अजय बग्गन, शिवा खाडे, सतीश चहाजगुणे,कन्हैया पांडव, दीपक छांगाणी ,श्यामल देशमुख, आदी आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



