गुन्हेगारीमहाराष्ट्रसामाजिक

माटरगाव शिवरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

विदर्भ प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव कारने सोबत जात असताना युवकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच यावयन् वाद झाला असता सदर मुलीच्या वडीलांना मारहाण केली. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी माटरगाव शिवारात घडली.मोताळा तालुक्यातील लोणघाट येथील कुटुंबीय २७ ऑक्टोबर रोजी कारने माटरगाव येथे जात होते. दरम्यान रस्त्यात मनोज रामकिसन मच्छले (३०) रा. माटरगाव याने हात दाखवून त्यांची गाडी थांबविली व तो त्यांच्या कारमध्ये बसला. काही अंतरावर गेल्यावर यातील १५ वर्षीय मुलीचे वडीलांनी कार थांबवून लघुशंकेसाठी गेले व त्याचवेळी मुलीची आई कारच्या बाहेर रस्त्यावर उभी असतांना आरोपीने संधीचा गैरफायदा घेत मुलीशी गैरवर्तन करित तिचा विनयभंग केला. याबाबत पिडीत मुलीने हिवरखेड पो.स्टे.ला तक्रार दिली असून यावरून पोलिसांनी मनोज रामकिसन मच्छले याच्याविरूध्द कलम ३५४, ३५४ अ, ३२४, ३२३, ५०६ भादंवि सहकलम ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंधक अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button