महाराष्ट्रविदर्भ

तपवन बुद्धविहार, टेंभुर्णा येथे ३० मार्च रोजी भव्य धम्म समारंभाचे आयोजन….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

टेंभूर्णा- ता. खामगाव जि. बुलढाणा– भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने टेंभूर्णा येथील तपवन बुद्धविहार, महाप्रज्ञागिरी, संघभूमी येथे सोमवार दि. ३० मार्च २०२६ रोजी एक दिवसीय भव्य धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला बौद्ध समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाबाबत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रनेत्या तथा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या मा. प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रद्धेय बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेत धम्म, सामाजिक परिवर्तन व बौद्ध विचारांचा प्रसार याविषयी विविध मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमात भदंत भिक्खूंचे मार्गदर्शन,या धम्म परिषदेत अनेक मान्यवर भिक्खूंच्या धम्मदेसना होणार आहेत. यात पुज्य भदन्त राजज्योती, भदन्त विनयपाल महाथेरो, भन्ते शाक्यपुत्र राहुल, भन्ते यश तसेच भदन्त शीलानंद हे धम्म, करुणा व बौद्ध विचारांवर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान समाजप्रबोधनपर व्याख्याने, विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर व समता सैनिक दल कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तसेच कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार असल्याने उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी परिश्रम घेत असून देवाभाऊ हिवराडे व अशोकभाऊ सोनोने यांच्यासह अनेक कार्यकर्ते नियोजनात सक्रिय आहेत. त्यामुळे परिसरात कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख उपस्थिती तसेच विविध सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. परिसरातील बौद्ध बांधवांनी या ऐतिहासिक धम्म परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच “सर्व धम्म उपासक व धम्म उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,
असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button