रिसोड येथे “भगवा सप्ताह निमित्त” शिवसेनेची आढावा सभा संपन्न!

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताह साजरा करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे दिनांक ५ ऑगस्ट रोजी दु.४ वा.विश्वा लाॅन येथे रिसोड विधानसभेचे संपर्कप्रमुख मधुकरराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व वाशिम जिल्हा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, जिल्हाप्रमुख सुरेश भाऊ मापारी, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशमुख, रिसोड विधानसभा सहसंपर्कप्रमुख विश्वनाथ सानप, यांचे मार्गदर्शनात रिसोड तालुक्यातील गावांमध्ये भगवा सप्ताह दरम्यान नवीन शाखेची स्थापना करणे, सदस्य नोंदणी करणे, गटप्रमुख, बूथप्रमुख, आणि बि.एल.ए. यांच्या राहिलेल्या नोंदणी करून घेणे, इत्यादी भगवा सप्ताह दरम्यान कार्य करायचे आहेत. प्रत्येक सर्कल मध्ये हि कामे करायची आहेत असे मार्गदर्शन करतांना संपर्कप्रमुखांनी सांगितले यावेळी नामदेवराव हजारे,बंडुभाऊ शिंदे,तालुका प्रमुख नारायण आरु, तालुका समन्वयक घनश्याम मापारी, शहरप्रमुख संजयभाऊ इरतकर, सर्कल प्रमुख शिवाजी सोनुने, सुनील नागरे, दिलीप चोपडे, किशोर काळे,शंकर सुरुशे सरपंच, सुभाष राजाराम सदार तंटामुक्ती अध्यक्ष, शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.



