बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अवैध वाळू तस्करांच्या दोन मशिन जप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरेजळगाव (जा), ता. २८तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील रेती घाटांमध्ये अवैध वाळू तस्करी जोरात सुरू आहे. काही दिवसापूर्वी अवैध रेती वाहतूक प्रकरणात रेती भरताना एका आदिवासी मजुराचा मृत्यू झाला होता. तरीसुद्धा ही अवैध रेती वाहतूक थांबली नाही. अशातच गोळेगाव हुरसाळ पूर्णा नदीपात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीची चार ते पाच वाहने रेती भरत असल्याच्या माहितीवरून वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी (ता. २८) रोजी रेती वाहतुकीला आळा घालण्याच्या दृष्टीने तहसीलदार शीतल सोलाट यांनी गोळेगाव हुरसाळ येथील पूर्णा नदी पात्रात जाऊन शासकीय जागेवर रेती उत्खननाच्या दोन केनी मशीन जप्त करून त्या सरपंचआणि पोलिस पाटील यांच्या स्वाधीन केल्या. यावेळी ग्रामस्थांना अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी माजी सुभेदार विनय मोहाते हे सुद्धा होते. गतवर्षी १६ मे २०२२ रोजी पहाटे टाकळी पारस्कर शिवारात बागायती शेतीला पाणी देण्यासाठी जाणाऱ्या पद्माकर गावंडे नामक मजुराला सुद्धा अगदी निर्दयपणे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरने चिरडून ठार केले होते. त्यानंतर सुद्धा अवैध रेती वाहतुकीला आळा बसला नाही. नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी शैलेश काळे हे अवैध तस्करीला प्रतिबंध घालण्यात यशस्वी होतात का हे पाहावे लागेल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button