महाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक

डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाला लाभले रामोत्सव निमंत्रणाचे भाग्यनागपुरच्या संघ स्वयंसेवकांकडून आली अक्षद अन् पत्रिका

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – येत्या २२ जानेवारीला अयोध्याधाम येथे मर्यादा पुरूषोत्तम प्रभु रामचंद्र यांची प्रतिष्ठापना आणि मंदिराचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. देशभरात रामोत्सवाचा उत्साह असून डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयाला देखिल या सोहळ्याच्या निमंत्रणाचे अहोभाग्य लाभले आहे. थेट नागपूर येथून २५० हून अधिक निमंत्रण पत्रिका आणि अक्षदा डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्या आहेत. रामोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या रामोत्सव सोहळ्यासाठी देशभरात दिवाळीसारखे चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातील प्रतिष्ठाने, शैक्षणिक संस्था यांच्यातर्फे या सोहळ्यानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर या सोहळ्याच आपलाही खारीचा वाट रहावा म्हणून डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयास प्राप्त झालेल्या निमंत्रण पत्रिका आणि अक्षदांचे वितरण केले जात आहे. निमंत्रण पत्रिका आणि अक्षद देतांना दि. २२ जानेवारीला रामोत्सव सोहळ्यानिमीत्त घरोघरी रामज्योत प्रज्ज्वलित करून दिपावली साजरी करण्याचे आवाहन महाविद्यालयातील विद्यार्थीनींंकडून केले जात आहे. तसेच डॉ. केतकी पाटील नर्सिंग महाविद्यालयात दि. २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button