सेवानिवृत्त जवानांना जनतेचा सलाम

*सेवानिवृत्त जवानांना जनतेचा सलाम*
केनवड येथील ग्रामस्थांनी वाजत-गाजत मिरवणूक काढून केले अनोखे स्वागतवाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड वाशिम – : पूर्वी सैन्य दलातून एखादा सैनिक सेवानिवृत्त झाल्याचे कोणाला समजायचेही नाही. मात्र, आता या उलट चित्र सगळीकडे पाहायला मिळतेय. सेवानिवृत्त होणा-या सैनिकांचे जंगी स्वागत करण्यासाठी आख्खं गाव महिनाभरापासून तयारी करत असते.केनवड प्रतिनिधि-:दिपक पाटील शेवाळे केनवड-: सैन्य दलातील जवानांप्रती लोकांमध्ये आत्मीयता वाढत असून, देशसेवा करून आपल्या घरी परतणाऱ्या सैनिकांना जनताच आता सॅल्यूट ठोकत आहे. आख्खं गाव सेवानिवृत्त सैनिकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असून, कोणी घोड्यावर तर कोणी अश्वरथामध्ये बसवून तर कुणी डीजे लाऊन सैनिकांची वाजत-गाजत मिरवणूक काढत आहे. हे चित्र अलीकडे अनेक ठिकाणी पाहायला मिळत असून, लोकांमध्ये देशाभिमानही जागृत होत आहे.केनवड येथील शंकरराव देशपांडे यांचे कनिष्ठ चिरंजीव अभय देशपांडे हे वीस वर्षापूर्वी सैन्य दलात रुजू झाले होते.नुकताच त्याचा सैन्य दलातील कार्यकाळ संपल्याने त्यांच्या मूळ गावी केनवड येथे दाखल झाले.त्यांनी तब्बल वीस वर्ष देशासाठी आपली सेवा देतांना. कश्मीर, प.बंगाल , आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, बिहार, इत्यादी ठिकाणी ते कर्तव्यावर होते. यादरम्यान अनेक अनुभव घेऊन देशसेवा केली.त्यामुळे केनवड येथे पोहचताच ठिकठिकाणी जल्लोशात स्वागत केले.वाशिम जिल्हा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळात लढाईमध्येही मोठे योगदान दिले आहे. ही परंपरा आपल्या सैनिकांनी आजतागायत सुरूच ठेवली आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यातून सैन्य दलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुक्यातील केनवड हे गाव केवळ त्या गावातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्य दलात भरती होत आहेत.ही केनवड गावासाठी अभिमानास्पद आहे.तसेच अनेक गावे आता सैनिकांची म्हणून ओळखू लागली आहेत. एका-एका गावात दोनशे ते चारशे युवक सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यामुळे जवानांबद्दल समाजात आदर आणि सहानुभूतीही निर्माण होत आहे.पूर्वी सैन्य दलातून एखादा सैनिक सेवानिवृत्त झाल्याचे कोणाला समजायचेही नाही. मात्र, आता या उलट चित्र सगळीकडे पाहायला मिळतेय. सेवानिवृत्त होणा-या सैनिकांचे जंगी स्वागत करण्यासाठी आख्खं गाव महिनाभरापासून तयारी करत असते. ज्या दिवशी सेवा संपवून सैनिक गावात येतात. त्या दिवशी गावातील सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहेत.सेवानिवृत्त सैनिकांना घोड्यावर तर कोणी उघड्या जीपमधून जवानांची गावातून वाजत-गाजत फुलांचा वर्षाव करत मिरवणूक काढत आहे. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने जवानांचे स्वागत करण्याची परंपरा आता गावोगावी सुरू झाली आहे. यामुळे तरुणांना प्रेरणा मिळत आहे.आपल्या स्वागतासाठी जनतेकडून आपुलकी आणि भावना अशा प्रकारे व्यक्त होत असल्याचे पाहून अनेक जवान भारावून जात आहेत. तर अनेक जवानांना अश्रूही आवरता येत नाहीत. ‘भारत माता की जय,’चा गजर करत जनतेमधून देशाभिमान जागृत केला जात आहे. अशा प्रकारे कोणत्याही नोकरीतून एखादा सेवानिवृत्त झाला तर त्याचे स्वागत होत नसते. मात्र, याला सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान अपवाद ठरले आहेत.या वेळी माजी सैनिक अनिल खराटे, सुरेश आढाव ,अंबादास सोळंके, सुधीर पाटील गोळे, ज्ञानेश्वर खराटे, संदीप सातपुते, राहुल खराटे, केशव भोसले, रामा उगले, मदन बाजड ,महादेव काळे, रियाज शेख, गजानन काळे, रवी अवचार, जनार्दन शेवाळे, साहेबा वाकुडे , प्रल्हाद शेवाळे, सरपंच संदीप गोळे,विकास खराटे उपसरपंच,पोलीस पाटील माणिक खराटे,तलाठी मनोज केंनवडकर मित्र मंडळी गजानन कवडे ,पुरुषोत्तम गोळे, शामा सोळंके, संजय ढेंगळे, कैलास डुकरे, संजय खाटोकर, बाबुराव नवघरे, अनंता आवचार, संतोष खराटे, गजानन खराटे, प्रदीप जाधव, गणेश मानवतकर, बबन खराटे,दीपक वाळूकर सरपंच जोगेश्वरी,जगन जाधव मित्रमंडळी व गावकरी मंडळी तसेच ओम नम शिवाय विश्व आदिवासी आश्रम शाळा केनवड येथील मुख्याध्यापक मानिकांत मिसाळ,अरुनकुमार गोळे,शिक्षक श्री सदार,कंकाळ,ठाकरे,खडसे,वाघ, लिपिक गणेश गोळे व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.



