निवडणूकबुलढाणा

चिखली नगराची विकासाला साथ, भीती निर्माण करणाऱ्या ‘बोन्द्रे’ ऐवजी आ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास…

चिखली नगरपालिकेत भाजपाचा झेंडा,पंडितराव देशमुख नगराध्यक्ष पदी विजयी…

स्टार भारत लाईव्ह ऐकसप्रेस

चिखली: प्रतिनिधी

आरुना दतात्रय खंडागळे

चिखली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पंडितराव देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला असून, हा विजय चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रभावी मार्गदर्शनाचा आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा ठळक प्रत्यय देणारा ठरला आहे.

या निवडणुकीत भाजपाचा विकासाचा अजेंडा, आमदार श्वेता महाले पाटील यांची विकासाची स्पष्ट हाक, तसेच चिखली शहरात सुरू असलेली विविध विकासकामे यांना मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर असलेला जनविश्वास आणि त्यांनी चिखली शहरात घेतलेल्या जाहीर सभेमुळे भाजपाच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले, असे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

पंडितराव देशमुख यांचा साधा,सरळ आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सहज मिसळणारा स्वभाव, तसेच स्थानिक प्रश्नांची जाण सोबतच तरुण तडफदार आ.श्वेता महाले यांनी चिखली शहरासाठी मोठया प्रमाणावर खेचून आणलेला विकासनिधी व नियोजित शहर विकासाचा आराखडा यामुळे चिखलीकरांनी पंडितराव देशमुख यांना मोठ्या विश्वासाने नगराध्यक्ष पदाची संधी दिली. विकासाला प्राधान्य देणारी भूमिका, पारदर्शक कारभाराची हमी आणि सर्व घटकांना सोबत घेऊन शहराच्या प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार यामुळे हा विजय अधिक अर्थपूर्ण ठरतो.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शहरातील लोकांना भीती दाखवली. बॉम्बे मार्केट असो किंवा मुस्लिम वस्तीतील आणि इतर वस्त्यांमधील अतिक्रमणे असो किंवा हातगाडी किंवा छोटे व्यवसाय करणारे व्यावसायिक असो यांना भीती दाखवण्यात आली.

त्याचप्रमाणे आमदार श्वेता महाले आणि भाजपा कुटुंबातील सगळ्यांचे मनोधर्य खचावे म्हणून मंत्रालय अधिकारी असलेले श्री विद्याधर जी महाले यांच्या बदनामीसाठी राहुल बोंद्रे यांच्याकडून पद्धतशीर मोहीम राबविली गेली.

परंतु यापैकी कशालाही बळी न पडता आमदार श्वेता महाले यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत चिखलीकरांनी श्वेता ताईंच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंडित दादा देशमुख सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला चिखली नगराध्यक्ष पदावर बसवले.

बोंद्रे कुटुंबाच्या परंपरागत गढीवर शेवटचा हातोडा मारण्याचे काम विद्याधर महाले यांची बदनामी करून काँग्रेसने स्वतःच केले. राहुल बोंद्रे यांचा विद्याधर महाले यांच्यावर असलेला वैयक्तिक आकस, आणि आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्यासारख्या सुसंस्कृत राजकारणी स्त्रीच्या नावाचा अपभ्रंश करून मूर्खपणा करण्याचे पाप करणाऱ्या राहुल बोंद्रे आणि काँग्रेसला चिखलीतील जनतेने चांगलाच धडा शिकवला असे मत चिखलीतील जनतेतून व्यक्त होत आहे.

या निकालामुळे चिखली शहराच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळणार असून, नगरपालिकेत भाजपाच्या माध्यमातून विकासकेंद्रित आणि लोकाभिमुख प्रशासनाची नवी सुरुवात होईल, असा विश्वास कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button