वैचारिक महासंग्राम बुलडाणा जिल्हा युवा सेनेची सडेतोड वकृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी…
चिखली : दिः7/6/2026 .
संपूर्ण महाराष्ट्रभर युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना नेते आमदार वरुणजी सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवा सेनेचे वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये दि.7 तारखेला जिल्हास्तरीय, 10 तारखेला विभागीय स्तर, तर 14 जुन रोजी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला.
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय भविष्याविषयी आपली भूमिका स्पष्ट करत, सार्वजनिक जीवनात नेतृत्वाचे पहिले व्यासपीठ ठरले. त्यामुळे अनेक युवक, युवती यांनी सहभाग घेऊन भविष्यातील सामाजिक, राजकीय महाराष्ट्राविषयी आपल्या भावना विशद केल्या. युवासेनेने बुलढाणा जिल्ह्यामध्ये घेतलेला हा उपक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट हॉल येथे पार पडला. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख नरुभाऊ खेडेकर, स्पर्धेचे आयोजक युवासेनेचे जिल्हाप्रमुख नंदुभाऊ कर्हाडे, शिवसेना शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे यांनी आपले मार्गदर्शन केले.
स्पर्धेसाठी ज्यांचे विशेष सहकार्य लाभले असे युवा सेनेचे शहरप्रमुख आनंद गैची, उपजिल्हाप्रमुख अशोक राजपूत, विधानसभा संघटक हरिभाऊ इंगळे, शहर समन्वयक अनिल जावरे, उपशहरप्रमुख सर्वश्री शंभु गाडेकर, रवी पेटकर, समाधान जाधव, गणेश कुडके, बंडु गारडे, शेख सोहेल हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्राचार्य विजय डोंगरदिवे सर व बि.टी.म्हस्के सर यांचे विशेष सहकार्य निवड समितीत लाभले. अशा अतिशय उत्साहाच्या वातावरणात युवासेनेचे सडेतोड वर्कृत्वस्पर्धा अनेक युवकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.



