खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

मुक्ताईनगर नगरपंचायत सफाई कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टी आणि शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांचा पाठिंबा

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-

सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर नगरपंचायत चे सफाई कामगारांनी मागील तीन दिवसापासून मुक्ताईनगर नगरपंचायत च्या समोर बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलेले आहे मुक्ताईनगर ग्रामपंचायत काळापासून जी सफाई कर्मचारी सेवा देत आहेत गेल्या पाच वर्षापासून ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यानंतर सुद्धा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे प्रशासनाकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही त्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुढील मागण्यांचे पत्र मुख्याधिकारी मुक्ताईनगर नगरपंचायत यांना वेळोवेळी दिलेले आहे त्यामध्ये कामगार आयुक्तांच्या पत्रानुसार किमान वेतनाप्रमाणे पगार मिळणे दिनांक २७/२/२०१९च्या पत्रानुसार समावेशन न झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना समावेशन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे कायम कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वागणूक देण्यात यावी व लाभ देण्यात यावा समाविष्ट झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सुट्टी पगारी रजा मेडिकल रजा कलेक्टर आदेशानुसार वर्षाच्या २७ सुट्या,मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील प्रभारी मुख्याधिकारी हे नेहमी सफाई कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत असतात कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न एकूण घेत नाही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, नगर विकास विभाग परिपत्रक क्रमांक जी इ एन /१०८९/१७९/सी आर १९३/नवि दीं९/१०/१९८९व म. संचालक न. प्र. मुंबई यांचे पत्र क्रमांक न. प्र. मुंबई यांचे पत्र क्रमांक नप प्र स,२०२२/लापासका/सर्व न.प./प्र .क्र.१९/कक्ष ४ दिनांक २५मे,२०२२ व शासन परिपत्रक क्रमांक नगर विकास विभाग क्र नगर विकास विभाग क्र. सफाई२०१६/प्र क्र३७०/नवी २०दीं २७-९-२०१६ नुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी सोडवणे बाबत संदर्भ जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील दिलेले पत्र जा क्र. अ. भा. रा.का. सं.२२२/२३दीं ६/१०/२०२३अशा वरील प्रमाणे मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत मुक्ताईनगर यांना देण्यात आलेले आहे नगरपंचायत सफाई कर्मचारी तीन दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन करून नगरपंचायत च्या दालना समोर बसलेले असताना प्रशासनाचे कुठलेही प्रतिनिधी या आंदोलकांना भेट देण्यासाठी अद्याप पर्यंत आलेले नसल्याचे समजते नगरपंचायत चे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी आंदोलनाला दोन दिवस उलटल्यावर सुद्धा भेट दिली नव्हती या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांनी मुख्याधिकारी तायडे यांच्याशी फोनवरून विचारणा केली की तुमच्या दालनासमोर सफाई कर्मचारी बसलेले असताना तुम्ही त्यांच्याशी कुठलीही चर्चा करण्यासाठी का येऊ शकत नाही तुम्ही आंदोलकांशी चर्चा करून यावर तोडगा काढला पाहिजे जेणेकरून सफाई कर्मचारी परत आपापल्या कर्तव्यावर परततील आणि मुक्ताईनगर मधील प्रत्येक वार्डामध्ये स्वच्छता केल्यामुळे जी जनता त्रस्त आहे ती सुद्धा सुटकेचा श्वास सोडेल तुम्ही सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे त्या सोडवून तुमचं काम आहे तुम्ही या सफाई कर्मचाऱ्यांची वार्तालाप केलाच पाहिजे असे बोलता बरोबर मुख्याधिकारी तायडे यांनी पवन सोनवणे यांना तुम्ही मला धमकी देता का त्यांच्या समस्या त्यांच्या मागण्या तुम्ही समजून घेतल्या का असे उलट पक्षी त्यांनाच जाब विचारण्यास सुरुवात केली असे मग्रुरी चे उत्तर एखाद्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळणे अपेक्षित नाही त्यामुळे काम बंद आंदोलन करणारे सफाई कर्मचारी अधिकच चिडले व त्यांनी पुढील आंदोलन यापेक्षा अधिक तीव्र करण्याचा इशारा सुद्धा देण्याचे कळते आहे. या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर भारत मुक्ती मोर्चा चे जिल्हा संयोजक नितीन गाढे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांनी पाठिंबा दिलेला आहे व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे सुद्धा आश्वासन दिलेले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button