महाराष्ट्रविदर्भ

अन्न व नागरी पुरवठा विभाग बुलढाणा याज कडून जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे जाहीर आवाहन !!!सत्य परिस्थिती!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस, 


प्रतिनिधी संग्रामपूर, 


रतन भगत. 


  सविस्तर वृत्त असे की बाहेरील देशातील युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा बंद होणार अशा चुकीच्या बातम्या व अफवा ह्या पसरवल्या जात आहेत तरी जनतेने साधनता बाळगावी ही केवळ अफवाच आहे हे सत्य परिस्थिती नाही. केवळ नफेखोरीच्या उद्देशाने काही सभाजकंटक अशा अफवा पसरून साठेबाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जनतेची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने प्रशासनाने एक जनतेला महत्त्वाचा आदेश देण्यात आलेला आहे जिल्ह्यात इंधन साठा हा फार मोठ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे पेट्रोल पंपावर नागरिकांनी जनतेने विनाकारण गर्दी करू नये असे जाहीर आवाहन केलेले आहे. अफवा पसरवणाऱ्या वर किंवा पेट्रोल व डिझेल वाडी दराने किंवा चढत्या दराने विक्री करणाऱ्यांवर कठोर अशी दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जनतेने शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये सदर माहिती ही जिल्हा पुरवठा अधिकारी अन्न व नागरी पुरवठा विभाग बुलढाणा यांनी दिलेली आहे. 

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button