कामगारांचे नोंदणी, नुतनीकरण आणि लाभाचे अर्ज तत्काळ निकाली लावा. शिवसेनेचे कामगार अधिकारी यांना निवेदन.

स्टार भारतला एक्सप्रेस
प्रतिनिधी – प्रशांत चव्हाण
बुलढाणा- जिल्ह्यात पाच ते सहा महिन्यापासून बांधकाम कामगार यांचे नोंदणी अर्ज तसेच नुतनीकरण आणि त्यांचं पाल्यांचे शैक्षणिक लाभाचे अर्ज हे प्रलंबित आहे. त्यामुळे कामगार हे आपल्याला मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहत आहेत. हे सर्व अर्ज तत्काळ मार्गी लावाण्याची मागणी शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे बुलढाणा जिल्हाप्रमुख .सागर झगरे यांनी २२ मे रोजी सरकारी कामगार अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे कि चिखली तालुक्यामध्ये कामगारांची नुतनीकरण ची संगणक प्रणाली जवळ पास बंद असते.अर्ज सादर केल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांना कागदपत्रे पडताळणीची तारीख दिली जाते. आणि पडताळणी होऊन सुद्धा काही वेळेस अर्ज नामंजूर करण्यात येतो. त्यामुळे कामगारांना कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाही. तसेच मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्या मध्ये ग्रामसेवक हे गावातील कामगारांना ९० दिवस कामाचे प्रमाणपत्र देत नाही. कामगार अधिकारी यांनी काही उपाययोजना कराव्यात.शैक्षणिक लाभाचे अर्ज विनाकारण त्रुटी मध्ये टाकून नामंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे कामगार शैक्षणिक लाभापासून वंचित राहत आहे. अश्या सर्व बाबींमुळे कामगार फार हवालदिल झाला आहे. तरी सर्व बाबींचा विचार करून कामगारांचे कामे सुरळीत सुरु करावे.जर कामे लवकरात लवकर सुरु नाही झाले तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले.
यावेळी चांद शाह ( शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष ), विष्णू भगवान गाडेकर ( शिवसेना बांधकाम कामगार सेना तालुका प्रमुख चिखली ) , राजू मोरे, प्रदीप खंदारे, यांच्या सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.



