
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चेत अजिबात तथ्य नाही. कुंबहूना ते नाराज असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ठाम प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काल ४ ऑक्टोबरला घोषणा झाल्यावर आज दिलीप वळसे पाटील बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. आधी संतनगरी शेगावात जाऊन त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर बुलढाण्यात दाखल झाल्यावर त्यांनी विश्रामगृहावर माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अजित दादांच्या नाराजीचा मुद्दा खोडून काढला.
आर्थिक अडचणी असलेल्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटींचे सॉफ्ट लोन ‘देण्याचे आश्वासन अजित दादांनी दिले होते. त्यानंतरच आमदार शिंगणे दादा सोबत आले. त्यामुळे बँकेला लोन मिळणार का आणि केव्हा असा प्रश्न उपस्थित केला असता दादांनी शब्द दिल्याने मी त्यावर बोलणे योग्य होणार नाही.
यासाठी आपण प्रयत्न करणार का? असे विचारले आमदार शिंगणे व दादांमध्ये मध्यस्थी करण्याचे फारसे काम नाही. आमदार शिंगणे त्यांना थेट भेटु शकतात. यासाठी सहकार मंत्री म्हणून आपण सहकार्य करणारच अशी ग्वाही ना वळसे पाटील यांनी दिली. कार्तिकी एकादशीला कोणता उपमुख्यमंत्री विठ्ठलाची महापूजा करणार हे मुख्यमंत्री ठरतील असे सांगून त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. याशिवाय बुलढाणा जिल्ह्याचे अभ्यास केल्यानंतरच जिल्ह्याच्या विकास कामासंदर्भात बोलेल असे ते म्हणाले.



