रजत नगरी बायपासचे आमदार अँडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते लोकार्पण!

**केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात संपूर्ण देशाचे तसेच राज्यातील विविध रस्त्यांचे आदरणीय केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात नूतनीकरण व चौपदरीकरनाचे काम सुरू आहे. यातील खामगाव शहराजवळून जाणाऱ्या *रजत नगरी* बायपासचे आमदार आकाश फुंडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मुंबईकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील अकोला नांदुरा दरम्यान खामगाव शहराजवळील बायपासचे काम नुकतेच पूर्ण झाले. या बायपासच्या कामाचे आज दि. 12 एप्रिल 2023 रोजी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस संजय शिंनगारे, खामगाव भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राम मिश्रा, विनोद टिकार, महेंद्र रोहनकार, नगेंद्र रोहनकार, विद्यार्थी आघाडीचे आशिष सुरेका, अभिजित एदलाबादकर, गुलजम्मा शहा, संजय वर्मा, माँटी कार्लो कंपनीचे पवनजी धिमन, दिलिप सिंग, अग्रवाल यांची उपस्थिती होती.



