अकोलाखानदेशजळगावा जिल्हाबुलढाणाराजकीयविदर्भ

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा प्रतीनीधी

खामगाव (दि. ३ ऑगस्ट) : महात्मा गांधी सभागृह, खामगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन रविवारी राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते पार पडले.

या महोत्सवाचे आयोजन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद, जी.एस. कॉलेज खामगाव आणि रोटरी क्लब खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री फुंडकर यांनी विविध रानभाज्यांच्या स्टॉल्सला भेट देऊन रानभाज्याची माहिती घेतली. पारंपरिक आहार संस्कृती जपण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, असे फुंडकर यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना रानभाज्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यदायी लाभ लक्षात घेऊन पारंपरिक शेतीसोबत रानभाज्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर द्यावा.” असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अकोला मनोजकुमार ढगे, तहसीलदार सुनील पाटील, आत्मा योजनेचे सहायक संचालक पुरुषोत्तम डे, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. विकास जायभाय, जीएस कॉलेजचे प्राचार्य धनंजय तळवणकर, डॉ. अशोक पांडव, रोटरी क्लब खामगावचे अध्यक्ष रो. नरेंद्र भट्टड आणि प्रकल्प प्रमुख रो. आलोक सकरगल्ले आणि रोटरी क्लब चे प्रसाद अग्रवाल, यांची उपस्थिती होती.

हा रानभाजी महोत्सव सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी रानभाजी प्रदर्शिनीला भेट देऊन आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या रानभाज्या व त्यांचे महत्व समजून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महोत्सवास पहिल्या दिवशी शेतकरी, बचतगट महिला, विद्यार्थी आणि नागरिक यांचा प्रतिसाद मिळाला.
🙏🏻

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button