बुलढाणा
सुश्री अलकाश्री यांची ३१ ऑक्टोबर रोजी भजन संध्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगाव संतनगरीत ३१ ऑक्टोबर रोजी विदर्भ मिरा प. पू. संत सुश्री अलका श्री यांचे अमृतमय वाणीतून संगीतमय सुंदरकांड व भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. रोकडीया नगर येथील देशमुख मंगल कार्यालयात सायंकाळी ५ वाजता या धार्मिक कार्यक्रमास सुरूवात केली जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन सुरेश बजरंगलाल शर्मा यांनी केले आहे. तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



