तेल्हाऱ्याचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी केले विद्यार्थी व पालकांना आवाहन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.१८ ; समाधान सोनवणे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय तेल्हारा यांचे कडून प्राप्त माहितीनुसार तेल्हारा तालुक्यातील सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, दहावी व बारावीच्या परीक्षेचे निकाल येत्या काही दिवसांत लागणार आहेत. त्यानंतर मुलांच्या पुढील शिक्षणाची काळजी पालकांना असते. मुलांना पुढील शिक्षण कोणते दयायचे यांचे नियोजन पालकांनी अगोदरच केलले असते. करीता आपल्या पाल्यांना त्यासाठी तहसिल कार्यालया मार्फत पुढील दाखले शैक्षणीक कामासाठी दिले जातात.
१) जातीचा दाखला ,२) नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र ,३) उत्पन्नाचा दाखला १ वर्षे, ३ वर्षे ,४) अधिवास प्रमाणपत्र / डोमसियल ,५) रहिवाशी प्रमाणपत्र ,६) अल्पभुधारक दाखला ,७) भुमीहीन दाखला ,८) केंद्रीय जातीचा दाखला,९) आर्थीकदृष्टया दुर्बल घटकांचा दाखला ई. सदर दाखल्यांची विदयार्थींना आवश्यकता असते, करीता सर्व नागरीकांना सुचीत करण्यात येते की, आपल्या पाल्यांना पुढील प्रवेशा करीता लागणारे कागदपत्रे सेतु मधुन निकालापुर्वीच काढुन घेण्यात यावे. तसेच दहावी व बारावीचा निकाल जुनमध्ये लागणार असल्याने गर्दी वाढल्याने दाखले वेळेत मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्यामुळे कागदपत्रे मिळण्यास विलंब होतो असे होऊ नये त्या करीता लवकरात लवकर दाखले काढून घेण्याचे आवाहन तेल्हारा तहसीलचे तहसीलदार समाधानजी सोनवणे यांनी केले आहे जेणे करून आपल्या पाल्यांचा शैक्षणीक प्रवेश सुकर होण्यास मदत होईल



