अकोलाखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रविदर्भ

जळगाव जिल्ह्यातजळगाव जिल्ह्यात तात्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या;

जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे मका, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व इतर सर्व खरीप पिके पूर्णपणे करपून नष्ट झाली आहेत. शेतात पिके उरलेली नसून हाताला पैसा नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, अशा अत्यंत बिकट परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे मोडून पडले आहेत. या गंभीर व आपत्कालीन परिस्थितीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जळगाव जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची सरसकट व थेट आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती विधान परिषद सदस्य तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाच्या दीर्घखंडामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. या बिकट परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने कागदी औपचारिकता आणि पंचनाम्यांच्या नावाखाली वेळ न घालवता तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या पिक व शेती कर्जाची वसुली तात्काळ थांबवण्यात यावी आणि ७/12 उतारा कोरडा करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. तसेच फळबागदारांचे झालेले पिके बाहुबनासाठी तात्काळ मर्चिंग पेपरसह आवश्यक ते अनुदान उपलब्ध करून द्यावे आणि मागणीनुसार १००% अनुदानास शेततळी मंजूर करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

या निवेदनात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी १० महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ‘१ रुपयात पीक विमा’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करून त्यातील अटी व शर्ती शिथिल करण्यात याव्यात तसेच ई-पीक पाहणी व पीक नोंदणीतील सर्व तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, अशी मागणी आहे. तसेच दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची (विशेषतः आरोग्य, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व उच्च शिक्षण घेणारे) संपूर्ण शाळा व महाविद्यालयीन फी पूर्णपणे माफ करण्यात यावी, असेही सुचवण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक गावात हाताला काम मिळण्यासाठी जलसंधारण, शेतरस्ते व इतर कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत (नरेगा) तात्काळ सुरू करण्यात यावीत, ग्रामीण व नागरी भागात पिण्याच्या पाण्याचा मुबलक पुरवठा करावा आणि पशुधनासाठी चारा, पाणी व लसीकरण मोहीम तात्काळ राबवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

दिव्यांग, निराधार, वृद्ध, लाडकी बहीण व इतर सर्व शासकीय योजनांचे मानधन लाभार्थ्यांना नियमित व वेळेत वितरीत करण्यात यावे आणि सर्वसामान्य व दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या रेशनकार्डबाबतच्या ई-डोस नोटिसा तात्काळ रद्द करून त्यांचा नियमित धान्य पुरवठा सुरू ठेवावा, अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने कागदी औपचारिकता टाळून जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व तातडीचा दिलासा देण्याकरिता वरील सर्व मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button