बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जनुना तलाव गार्डनला नमो उद्यान’ ऐवजी ‘नमो उद्यान जनुना’ नाव द्या; ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे नगरपरिषदेला निवेदन

जी डी रोकडे प्रतिनिधी खामगांव

दि. १५ जुलै : तालुक्यातील जनुना ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जनुना तलाव व बगीच्याच्या नुतनीकरणाच्या कामात गावाचे नाव कायम ठेवावे आणि या बगीच्याचे नामकरण केवळ ‘नमो उद्यान’ न करता ‘नमो उद्यान जनुना’ असे करावे, अशी मागणी जनुना ग्रामपंचायतीचे प्रशासक, सरपंच, सर्व पदाधिकारी व समस्त ग्रामस्थांच्या वतीने एका निवेदनाद्वारे नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनुना ग्रामपंचायत हद्दीत असलेला हा तलाव आणि गार्डन (बगीचा) जनुना गावाचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. या परिसराशी संपूर्ण गावाची ओळख आणि नागरिकांच्या भावना जोडलेल्या आहेत. सध्या नगरपरिषदेमार्फत या तलावाच्या व गार्डनच्या नुतनीकरणाचे अत्यंत स्तुत्य काम हाती घेण्यात आले आहे, ज्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.परंतु, या नुतनीकरणानंतर सदर गार्डनचे नाव केवळ ‘नमो उद्यान’ केले जाणार असल्याचे समजते. तसे झाल्यास जनुना गावाचे नाव व मूळ ओळख पुसली जाण्याची भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.त्यामुळे गावाची ऐतिहासिक ओळख कायम राहावी आणि स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर व्हावा, यासाठी नुतनीकरण होत असलेल्या बगीच्याचे नाव ‘नमो उद्यान जनुना’ करण्यात यावे. तसेच नुतनीकरणाच्या फलकावर व शासकीय अधिकृत नोंदीमध्ये ‘जनुना’ या गावाच्या नावाचा उल्लेख कायम ठेवण्यात यावा, अशी नम्र विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर जनुना गावातील प्रशासक सरपंच अस्मिता अमोल गव्हांदे, उपसरपंच ज्ञानदेव डवंगे ,माझी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अमोल गोरे, अख्तर खान पठाण,अमोल गव्हांदे यांच्यासह पदाधिकारी व बहुसंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button