छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एम जे कॉलेज जळगाव येथे साहित्य अभिवादन स्पर्धा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एम जे कॉलेज जळगाव येथे साहित्य अभिवादन स्पर्धा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी जळगावछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून एम जे कॉलेज जळगावच्या कॉन्फरन्स हॉल येथे आप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठान यांचे फविद्यमाने साहित्य अभिवादन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू , आंबेडकर यांचे जीवन कार्यावर संवाद स्वरूपात साहित्य वाचन प्रस्तुत करण्यात आले.परीक्षक चिंतामण पाटील ,राजेंद्र देशमुख ,मंजुषा भिडे,यांचे सोबत शरद भालेराव ,पियूष रावळ,हरिश्चंद्र सोनवणे सर विचारमंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक शरद भालेराव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले. आभार प्रदर्शन कुलदीप भालेराव यांनी केले. विजयी स्पर्धकांना कालकथित राजेंद्र भालेराव स्मृती करंडक व प्रमाणपत्र खान्देश नाट्य कलावंत सौ.सुनंदा गवळी सोनवणे यांचे हस्ते देण्यात आले. प्रथम क्रमांक संजय निकुंभ वॉरियर्स _ शिवशाहीच्या अज्ञात बेटावर द्वितीय क्रमांक काशिनाथ पलोड स्कूल जळगांव _राजे शिवाजी महाराज तृतीय क्रमांक आदित्य प्रतिष्ठान जळगांव _सावित्रीमाई एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. साहित्य अभिवाचन स्पर्धा यात 8 संघांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.



