आंतरराष्ट्रीयखानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलताना बागेश्वर बाबांचे वादग्रस्त विधान; नागपूरमधील भाषणानंतर उसळली संतापाची लाट…!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

प्रमोद सौंदडे

नागपूर येथे एका कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत त्यांनी केलेल्या विधानावरून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

भारतदुर्गा शक्तिस्थळाच्या शिलान्यास कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबांनी असा दावा केला की, “युद्ध करताना थकलेल्या शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींकडे जाऊन राज्यकारभार सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती” तसेच “आम्ही आता थकलो आहोत, विश्रांती हवी आहे, आता आपल्याला युद्ध लढायचं नाही, थांब कुठ आपण सांभाळा आपल्या आदमीने आम्ही चाललो आमच्याकडून युद्ध लढले जात नाही आता आम्हाला विश्राम हवा काही दिवस आम्ही काहीच करू इच्छित नाही” असे त्यांनी म्हटल्याचा
उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला.

यापुढे त्यांनी सांगितलेली कथा अधिकच वादग्रस्त ठरली. “शिवरायांनी मन मोकळा केल्यावर रामदास स्वामी यांनी स्मितहास्य केले आणि ते म्हणाले की, ठीक आहे तुम्ही आमचे कोण? यावर शिवाजी महाराज म्हणाले की आम्ही आपले शिष्य आहोत. आणि तुम्ही आमचे गुरु आहात. मग शिष्याचं कर्तव्य काय? असा सवाल रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना विचारला. त्यावर जो गुरु आज्ञा देणार त्याचं पालन करणे शिष्याचं कर्तव्य असल्याचं रामदास स्वामी म्हणाले आणि स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती शिवाजी महाराजांचे डोक्यावर ठेवला. आज पासून माझा राज्य आहे मी राज्य चालवणार तुम्हाला संचालन करायचं आहे.” असं वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी या कार्यक्रमात दिले. ते असेही बोलले की चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक स्वयंसेवक संघाला द्या असं आवाहन बागेश्वर बाबा केलं.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सनातन धर्म, भारत माता आणि संघाच्या कार्याबाबतही बागेश्वर बाबांनी भाष्य केले. आधीच राज्यात एका पुस्तकावरून निर्माण झालेला वाद ताजा असताना, या नव्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिक तापले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button